Ek Saanj Maitritali Prematali

Front Cover
BRONATO.com, 2020 M07 1

आयुष्य…आपलं जगणं यात खूप काही सामावलेलं असतं. आयुष्यातले सुखद क्षण आठवणींमध्ये रमलेले मन, भावनांचा कधीतरी झालेला उद्रेक, विचारांचे वादळ, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांनी बांधलेली नाती, विरह…. आसक्ती,

या सर्व गोष्टींना कारण असतं ते प्रेम… अन मैत्री….!

आपल्या आयुष्याला दिशाही देतं अन कधी कधी आपली दिशाभूल करतं अगदी स्वप्नांच्या दुनियेत जगावं असं आयुष्य आपण मैत्रीत… प्रेमात जगत असतो. सुखाचा आनंदाचा, जाणिवांचा विरहाचा परमोच्च बिंदू या नात्यांमध्येच जाणवतो. हृदयाच्या ठोक्यांना अर्थ प्राप्त करून देतात. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना मोत्यांचं रुपडं देतात. मनातल्या विचारांना, मनातल्या आर्त स्वराला कागदावर शब्दरुपात व्यक्त करतात. या शब्दांना प्रेमाची, मैत्रीची जोड असते जणू काही शब्दच यांची सावली असतात. याच प्रेमातल्या… मैत्रीतल्या भावनांना शब्दांमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.

‘एक सांज… मैत्रीतील.. प्रेमातली’ या काव्य संग्रहाची पहिली आवृत्ती तुमच्यासमोर घेऊन येत आहे.

मैत्री… प्रेम या भावनांना आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वादळांना, जाणिवांना, कल्पनांना माझ्या शब्दात आपल्यासारख्या रसिक वाचकांसमोर प्रामाणिकपणे साधा सरळ प्रयत्न केला आहे.

आशा करतो आहे कि रसिक वाचक या काव्यापुष्पाचा स्वीकार करतील.

कवी अर्चित

 

What people are saying - Write a review

User Review - Flag as inappropriate

अप्रतिम... मैत्री सगळेच करतात पण इतकी निर्मळ, पवित्र, आत्म्याला जाऊन भिडणारी, दोन जीव असुनही एक होऊन जगणारी मैत्री , एकमेकांच्या सुखात सुख शोधणारी आणि दुःखात एकवटून जाणारी मैत्री असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं...प्रत्येकाचं स्वप्नंच असते असं म्हणूया की.. पण हे सगळं वाटत असलं तरी ते व्यक्त करणं कींवा शब्दांत मांडणं नाही जमत... पण तूम्ही ते खूप सुंदर पद्धतीने अगदी मनात सामावेल असं, स्वतःच्या भावनांशी relate करू शकेल जणू काही आपल्याच मनातल्या अव्यक्त भावना जाणून घेऊन, समजून घेऊन शब्दबद्ध केल्यात.वाचतांना आपण हे वाचत नसून हवंहवसं वाटणारं मैत्रीतलं प्रेम जगतोय, ते अनुभवतोय अशा सुंदर, सुखद भावनेने मन भारावून गेलं.खुप सुरेख, सुंदर, अप्रतिम....
तुमचे खूप खूप अभिनंदन आणि असा विलक्षण अनुभव देण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद...
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
👏👏💐💐
 

Contents

Section 1
Section 2
Section 3
Section 4
Section 5
Section 6
Section 7
Section 8
Section 9

Common terms and phrases

अगदी अजून अन अन् माझ्या अर्चित अश्रू असं असणार असतं असतो असूनही असेन असेल आठवणींना आणि आता बस्स तू आपल्या आयुष्य आयुष्याच्या आहे मी आहेत एक साज एका डोळ्यात ओंजळीत कधी कनी करत करतात करून कवी का कारण काही गं मला गोड घट्ट घेऊन जगणं जगण्यासाठी जगायचं जाणीव ठेवून डोळ्यांतल्या तर ते प्रेम तरी ती तुझं तुझा तुझा हात तुझी तुझे तुझ्या डोळ्यांत तुझ्या मनाचा तुझ्या सोबत तुझ्यावरच तुझ्याशिवाय तुला तू आहेस तू माझ्या तू यावं माझ्या तूच ते प्रेम कसलं त्या दंग देतं नकळत ना नाही तर ते नाहीत निरागस पण पाऊल पाणावलेल्या प्रत्येक प्रेमाची प्रेमातली फक्त फक्त तुलाच बस्स तू यावं बेभान भावनांना मन मनाची मनाच्या मनात मनातल्या मनाला मला माझं माझी माझ्या आयुष्यात मात्र मैत्रीचा मैत्रीत मैत्रीतली म्हणून या यावं माझ्या आयुष्यात रंग वाट व्हावी शब्द शेवटच्या शोध समाधानी साथ साद सुंदर सुगंध सुद्धा स्वतःला स्वप्न स्वप्नांना हा हात ही हृदय हृदयाच्या हृदयात हे होऊन होतो क्षण

Bibliographic information